नंदुरबार शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जगतापवाडी परिसरात द्वारकानगर येथे घराच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याच्या टाकीत बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दोघे मुले मजुराची होती जे घराचे बांधकाम करत होता. ही मुले 3 डिसेम्बर मंगळवार पासून बेपत्ता होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. मुले बेपत्ता असण्याची तक्रार कुटुंबीयांनी जवळच्या पोलीस ठाण्यात केली होती.
पोलिसांनी कारवाई करत शहरभर मुलांचा शोध घेतला मात्र यश आले नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी दोन्ही मुलांचे मृतदेह घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडलेले आढळून आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. या अपघातामुळे कुटुंबीयांनी टाहो फोडला