रत्नागिरी : रत्नागिरी टोलनाका तोडफोड प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक

शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (13:06 IST)
Ratnagiri: रत्नागिरीच्या राजापूर हातीवली टोल नाका फोडल्यानंतर रत्नागिरीच्या पालीतील एका टोलनाक्यावर तोडफोड केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाई केली असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 16 जणांवर तोडफोड प्रकरणी अटक केली आहे तर तालुक्यातील 97 जणांवर  प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 

रायगड येथे देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर दक्षिण रत्नागिरीचे मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास राजापूर हातिवले येथील टोलनाक्याची तोडफोड करत घोषणाबाजी केली. 
नंतर त्यांनी रत्नागिरी तालुक्यात खानूच्या ह्यानं इन्फ्रा सोल्युशन प्रा. लि. कंपनीच्या कंटेनर कार्यालयात देखील तोडफोड केली. घटनेनंतर पाच जण पसार झाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाली च्या धोंड येथे शुक्रवारी एका जेसीबीची तोडफोड केली. पोलिसांनी हातिवले टोल नाक्याची तोडफोड केल्या प्रकरणी हातिवले येथील टोलनाका मोडतोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने ही माहीती दिली.  
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती