लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुरेश रामचंद्र पडये (वय-४६,राहणार कुर्णे,पडयेवाडी,ता.लांजा) याची घटस्फोटीत मुलगी असून, या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी फिर्यादी राजेश एकनाथ चव्हाण (वय ४०, राहणार गवाणे,ता.लांजा) इच्छुक होता. यासाठी राजेश चव्हाण आणि सुरेश पडये या दोघांमध्ये बोलणी सुरू होती. तसेच या संदर्भात ४ ऑगस्ट रोजी लग्नासंदर्भात बोलणे देखील झाले होते आणि लग्न करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानंतर राजेश चव्हाण हा सुरेश पडये याच्या कुर्णे येथे घरी पुन्हा एकदा लग्नासंदर्भात बोलणे करण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी दुपारी गेला होता. हे बोलणे सुरू असताना दोघांमध्ये किरकोळ स्वरूपात वाद झाले.
या वादातून सुरेश पडये याने घरातील कोयतीने राजेश चव्हाण यांच्या डोक्यावर कोयतीने वार केले.यामध्ये राजेश चव्हाण जखमी झाला असून त्याच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत.या घटनेत जखमी झालेल्या राजेश चव्हाण याने ७ ऑगस्ट रोजी रात्री लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.राजेश चव्हाण याने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेश पडये याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एन.एस.नावळेकर करत आहेत.