Ratnagiri Accident : दापोलीत भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

सोमवार, 26 जून 2023 (10:14 IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दापोली- हर्णे मार्गावर आसुद येथे ट्रकने मॅजिक प्रवासी रिक्षाला धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला. खाजगी प्रवासी वाहतूक करणारी टाटा मॅजिक गाडीची दापोलीकडून हर्णे कडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. या अपघात 8 जणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात इतका जोरदार होता की अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. बॉबी सारंग असे या चालकाचे नाव आहे. 
 
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात आसुद जोशी आळी येथे हा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाची चूक असल्याचे समोर आले आहे. या रिक्षेत बसलेले प्रवासी अंजरले, पाजपंढरी, अडखळ गावातील होते. या अपघातात दोन चिमुकलींचा मृत्यू झाला आहे. 
 
अपघाताची माहिती मिळतातच स्थानिकांनी धावत येऊन अनेकांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती