या योजनेवर प्रथमच राज ठाकरे यांनी वक्तव्य दिले आहे. ते सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला मतदान मिळेल असे सांगता येणार नाही. ही योजना जास्त काळ चालणार नाही.येत्या दोन ते तीन महिन्यांतच योजना बंद होऊ शकते. सरकारकडे पैसे कुठे आहे? लोकांना फुकटचे पैसे नको त्यांना रोजगार पाहिजे.
मध्यप्रदेशात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला यश मिळाले ते केवळ या योजनेमुळे नसून इतर देखील कारणे असू शकतात. या दोन महिन्यांत महिलांना हफ्ता मिळाला या पुढे देण्यासाठी पैसे कुठे आहे? अजित दादा म्हणाले, निवडून दिल्यावरच पहिल्या हफ्त्याची सहीअसेल. लोक फुकटचे पैसे मागत नाही त्यांना काम हवे आहे.
शेतकऱ्यांना फुकटची वीज नको तर अखंडित वीज पुरवठा पाहिजे. आता जे पैसे देण्यात आले आहे ते लोकांनी भरलेला कर आहे.राज्यात असंख्य नौकऱ्या आहे मात्र त्यांची माहिती तरुणापर्यंत जात नाही. लोक पैसे घेऊन सुद्धा मतदान करत नाही. असे ते म्हणाले. पैसे घेतल्यावर कोणी कोणाला मतदान केले हे कसे कळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.