राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. गारपीट आणि पावसामुळे शेकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात पालघर ,डहाणू भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून परभणी, वर्धा, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. राज्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर , बदलापूर, आणि अंबरनाथ येथे पावसाळा सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आला आहे. राज्यात अवकाळी पावसाची स्थिती अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे हवामानात बदल झाला आहे. राज्यात येत्या तीन ते चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील विदर्भ भागात अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा, वाशीम, गडचिरोली, चंद्रपूर भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण कर्नाटक आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.