पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल तिवडेवाड हे 9 मे 2023 रोजी राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसमधून कोच नंबर बी-5 मधून प्रवास करत होते. रात्री ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली. यावेळी तक्रारदार अनमोल तिवडेवाड यांच्या झोपेचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्याकडील हिऱ्यांचा हार व 50 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान,आपल्या बॅगमधील बॅगमधील हार व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार सापडून आला नाही. या प्रकरणी अनमोल यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.रेल्वे प्रवाशाचा हिऱ्याचा हार चोरट्याने लांबवला,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल तिवडेवाड हे 9 मे 2023 रोजी राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसमधून कोच नंबर बी-5 मधून प्रवास करत होते. रात्री ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली. यावेळी तक्रारदार अनमोल तिवडेवाड यांच्या झोपेचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्याकडील हिऱ्यांचा हार व 50 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान,आपल्या बॅगमधील बॅगमधील हार व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार सापडून आला नाही. या प्रकरणी अनमोल यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.