पुष्पा राज अपुन लिखेगा नही!

बुधवार, 6 एप्रिल 2022 (12:14 IST)
‘द पुष्पा राइस’हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटातील गाणी आणि संवादांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. लोक या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करत आहेत आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. विशेष म्हणजे, ‘मैं झुकेगा नहीं’या चित्रपटाचा डायलॉग खूप लोकप्रिय झाला आहे.
 
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून या चित्रपटातील संवादाचा परिणाम दहावीच्या विद्यार्थ्यांवर झाला असून एका विद्यार्थ्याने संपूर्ण उत्तरपत्रिकेत 'पुष्पा राज आपन लिखेगा नही' या संवादाच्या ओळी लिहिल्या. हे पाहून शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांनी दक्षिण भारताबरोबरच इतर भागातही भरपूर कमाई केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती