पायलटला हृदयविकाराचा झटका, बांग्लादेशच्या विमानाचं नागपुरात लँडींग

शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (16:15 IST)
एका प्रवासी विमानाला नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. जेव्हा मॉस्कोहून ढाकाला जाणारे विमान रायपूरवरून जात होते, तेव्हा वैमानिकाला अस्वस्थ वाटले आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. सह-पायलटने तत्काळ कोलकाता एटीसीशी संपर्क साधला आणि वैमानिकाच्या खालावलेल्या प्रकृतीविषयी माहिती दिली. यानंतर विमानाला नागपूर विमानतळावर उतरवण्याचे निर्देश देण्यात आले.
 
को-पायलटने विमान नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. विमानातील सर्व प्रवासीही सुरक्षित आहेत. यानंतर विमानाच्या वैमानिकाला रुग्णालयात नेण्यात आले आहे. को-पायलट आणि एटीसीच्या समजुतीमुळे मोठा अपघात टळला. जर को-पायलटने योग्य वेळी माहिती दिली नसती आणि कोलकाता एटीसीने विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी दिली नसती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती