भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे या भावा-बहिणीचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र, सध्या बीडमधील सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हे दोन्ही राजकीय विरोधक एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे हो म्हणत त्यांची भूमिका मांडली. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.