वृत्तानुसार, आर्यन हा वाशी येथे एका खासगी रुग्णालयाच्या समोर खेळत असताना तिथे ठेवलेले ऑक्सिजनचे सिलेंडर आर्यनचा डोक्यात पडले आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर आला आहे. या घटनेमुळे मृत मुलाचा नातेवाईकांनी रुग्णालयाचा व्यवस्थापकावर बेजाबदारपणासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास तयार नसून मुलाच्या मृत्यूमुळे परिसरातील वातावरण तापले आहे.