शहरातील तब्बल ११ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. त्यातच आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरातील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले आहे की, पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि पक्षाचे सचिव संजय मोरे, संजय माशीलकर, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, संपर्क प्रमुख जयंत साठे, संजय बच्छाव यांच्या सूचनेनुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नाशिक महानगरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा‼️