जळगाव पुरामुळे उपचारा अभावी एकाचा मृत्यू

मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (11:48 IST)
सध्या राज्यात पावसानं जोरदार सुरवात केली आहे.जळगाव मधील बोरी नदीला पूर आला आहे.जळगावच्या जवळच्या भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.सर्वीकडे पाणीच पाणी आहे.वीज पुरवठा खंडित झाला आहे.सर्व मार्ग बंद झाले आहे.अशा परिस्थितीत गावातील एक मुलगी तापाने आजारी पडली मात्र सर्वत्र पाणी असल्यामुळे आणि या गावात पूल नसल्याने पाण्यातूनच गावकरी ये जा करतात.अशात तिला वेळीच उपचार मिळाले नाही.याचे कारण म्हणजे गावात एक ही डॉक्टर नाही आणि तिला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाऊ शकले नाही.या मुळे त्या मुलीचा दारुण अंत झाला.तिच्या मृत्यू मुळे सर्व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
तालुक्यातील सात्री गावातील एक 13 वर्षाची मुलगी तापाने फणफणली होती.बोरी नदीला पूर आल्यामुळे आणि या गावात नदी पार करण्यासाठी एकही पूल नसल्यामुळे गावकरी या नदी पात्रातून आपला जीव धोक्यात टाकून ये जा करतात.तसेच या गावात रुग्णालय नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी या मुलीला अस्वस्थ वाटू लागले.गावकरांनी तिला खाटेवरून नदी ओलांडून नदी काठावर आणले परंतु तिचा वेळीच उपचार न मिळाल्याने दुर्देवी अंत झाला.तिला काही लोकांनी नदीपात्रातून आपला जीव धोक्यात टाकून रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
सात्री हे गाव पुनर्वसित आहे.या गावातील माजी सरपंचाने या गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहे.रुग्णालयात कसे जावे.असा प्रश्न  पुनर्वसन अधिकारी,गावठाण अधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी यांना केला होता.तरीही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.आणि या मुळे मुलीला वेळीच उपचार मिळाले नाही आणि त्या मुलीचा अंत झाला.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती