यवतमाळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनावरुन परतताना नववधूसह 3 जणांचा मृत्यू

यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ ट्रक आणि क्रुझरची भीषण धडक झाली आहे. यात नववधूसह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सात जण जखमी आहे.
 
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महाकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत असताना कुटुंबीयांवर काळानं घाला घातला. मारेगाव येथे यवतमाळवरुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. 
 
यात दोन जण जागीच ठार झाले. तर उपचारासाठी नेत असताना नववधूचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये लक्ष्मीबाई भारत उपरे (वय ६०), सानिका किसन गोपाळे (वय २०) आणि नववधू साक्षी देविदास उपरे (वय १८) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती