अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडला आहे. पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे दावा केला होता. मात्र जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. दुसरीकडे सहा मतदारसंघावरुन अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे. अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरु आहे.