या घटनेनंतर लगेचच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या. फटाक्यांचा कारखाना असल्याने स्फोट होण्याची भीतीही होती. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आणि आग विझवण्याचे काम सुरू ठेवले. आग विझविण्यासाठी सुमारे 9 अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या. हे संपूर्ण भयानक दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.