राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सध्या ड्रग्स आणि अंडरवर्ल्ड संबंधावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी मलिक यांना बिगडे नबाव म्हटलं. त्यांच्या ट्विटला मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी उत्तर दिलं आहे. निलोफर मलिक यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हटले अमृता फडणवीसांनी?
काल अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना बिगडे नवाब म्हटलं. प्रत्येकवेळी पत्रकार परिषद घेऊन खोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढच यांचं लक्ष्य आहे, अशी टीका त्यांनी केली.
निलोफर मलिक यांचे प्रत्युत्तर
अमृता फडणवीस याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना निलोफर मलिक म्हणाल्या, कापाट मध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे, असं निलोफर मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.