मुंबई - गोवा महामार्ग अपडेट : परशुराम घाटात रुंदीकरणाचे काम सुरु, रस्ता बंद

बुधवार, 20 एप्रिल 2022 (15:42 IST)
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम रखडले आहे.  दरम्यान, चिपळूण जवळील परशुराम घाटातील महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी एक महिना महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 
 
 रुंदीकरणाच्या कामासाठी 22 एप्रिलपासून दुपारी 12 ते 5 कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चिपळूण येथे झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून हे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र, आता 22 एप्रिलपासून महिन्याभरासाठी परशुराम घाटात रुंदीकरणाचे काम सुरु राहणार आहे. 
 
परशुराम घाट रुंदीकरणाचे काम आजपासून सुरु होणार होते. मात्र, खेडमधील लोटे एमआयडीसीतील कंपन्यांकडून स्थानिक प्रशासनाकडे नियोजनासाठी दोन दिवसांची मुदत मागण्यात आली होती. त्यामुळे 22 एप्रिलपासून परशुराम घाटातील वाहतुकीबाबतचे बदल लागू होतील, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती