MPSC Combine Exam :MPSC विद्यार्थ्यांचा डेटा लीक

रविवार, 23 एप्रिल 2023 (14:45 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी होणार आहे. या पूर्वी विद्यार्थ्यांचा डेटा लीक होण्याची धक्कादायक माहिती समोर आली असून विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचे समोर आले आहे. 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक(  Exam Hall Ticket Hack) करण्यात आले असून या विद्यार्थ्यांची माहिती मिळत आहे. आता आयोगाने या प्रकरणाच्या संदर्भात सायबर पोलिसांत तक्रार केली आहे.या मध्ये परीक्षा चे पेपर देखील लीक होण्याचा दावा केला जात आहे.  

 
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव  म्हणाल्या की, या गोष्टीवर पडताळणी केली जाणार  असून पेपर लीक होत नाही. हे सर्व  बनावट आणि खोटं आहे. वस्तुस्थितीची पडताळणी करून पेपर कधी होणार हे लवकरच कळेल. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ह्या बाह्यलिंकवर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यीची सुविधा बंद करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या बाह्यलिकंवरील विद्यार्थ्यांची हॉल तिकीट वगळता इतर डेटा लीक झाला नसल्याचं आयोगाने म्हटलं आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याचंही आयोगाने मान्य केलं आहे.
 
संबंधित टेलिग्राम चॅनेलकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध नसल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर आयोगाने विद्यार्थ्यांना काही सूचना केल्या आहेत.
 
आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करून घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेच प्रवेश देण्यात येईल.
प्रवेश प्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अडमिनविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्याची सखोल चौकशी करण्यात येईल असंही आयोगाने म्हटलं आहे.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. 

Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती