सुप्रिया शिंदेला पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी

शुक्रवार, 3 मार्च 2023 (08:00 IST)
वारणानगर : राज्य शासनाने वर्ग १ च्या विविध पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत केखले ( ता पन्हाळा ) येथील सुप्रिया शिवाजी शिंदे हिने पहिल्या प्रयत्नातच यश संपादन करून गावात पहिल्या महिला अधिकारी होणेचा मान मिळविला आहे .
 
जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या केखले डोंगराळ दुर्गम ग्रामीण असे आहे . गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसताना प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर तिने कोणतीही शिकवणी न लावता अभ्यासात सातत्य राखत पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले.
सुप्रिया हिच्या घरची परिस्थिती तशी बेताची आहे. प्राथमिक शिक्षण केखले येथे तर माध्यमिक शिक्षण कोडोली येथे झाले. १२ वी नंतर शासनामार्फत तिला पुणे येथील कृर्षी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला होता . घरची अर्थिक परीस्थिती बेताची असतानाही परीस्थितीवर मात करीत तिने कृर्षी विभागाची पदवी प्राप्त केली. वडील शिवाजी हे भारतीय सैन्य दलामधून शिपाई म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. देशाच्या प्रशासकिय सेवेत आपली मुलगी असावी अशी त्याची इच्छा होती. शासकिय सेवेत दाखल होणेसाठी तिने शालेय जीवनापासून दृढ निर्णय घेतला होता. पदवी चे शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली होती. विशेषता कोणत्याही प्रकारे खाजगी क्लासेस न लावता फक्त घरातच अभ्यास करीत अहोरात्र मेहनत घेतली. तिला प्राथमिक , माध्यमिक व महाविद्यालयीन अशा सर्वच स्तरातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा परीक्षेबाबत असलेली तिजी जिद्द व शाळेतील प्रगतीचा विचार करुन तिज्या आई कविता व वडील शिवाजी शिंदे यांनी तिला मोलाची साथ दिली. त्यामुळे तिला यश संपादन करणेस यश मिळाले. तिज्या या यशामुळे परिसरातून तिज्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती