पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी

गुरूवार, 17 जून 2021 (18:18 IST)
मान्सूनमुळे सतत पडत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र भिजत आहे. मुंबईत गेल्या आठ्वड्यापासून मुसळधार पाऊस येतोय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचतंय ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम बघायला मिळत आहे. मॉन्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातही पाऊस सुरुच आहे.
 
सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा, घाट या उपनगरांमध्ये विजेच्या गडगडाटसह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार तास तीव्र स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
 
तसंच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरौली, वर्धा आणि विदर्भ या ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली आहे. अजून काही तास विजेच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 

15.30, 17 June
Very intense cloud echoes over Santacruz, Virar, Palghar Dahanu, Boriwali, Kalyan, Panvel, Alibag, Khandala, Ghat areas of Satara and Pune as seen in Mumbai radar
very likely of intense spells in coming 3, 4 hrs
Pl see IMD Updates pic.twitter.com/wnLlYQxntS

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2021
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही पुढील तीन ते चार तास विजेच्या कडकडाटासह  मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती