आमदार नितीन देशमुख स्वगृही, रविवारी भाजपवापसी होणार

शनिवार, 17 जून 2023 (20:55 IST)
आमदार नितीन देशमुख यांची उद्या, रविवारी भाजपवापसी होणार आहे. कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये देशमुख हे भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत आशिष देशमुख 6 वर्षानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेतली. हा माझा भाजप पुनर्प्रवेश आहे, असे देशमुख यांनी सांगतिले.
 
आशिष देशमुख यांना फार मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र आहेत. पण जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमधील सुनील केदार गटाशी न पटल्याने आशिष देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश करत खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर ते सावनेर मतदारसंघातून सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढले. परंतु त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने सावनेरऐवजी काटोल मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव करत विजय मिळविला.
 
मात्र काही वर्षांमध्येच त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भ विकासाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले.  नंतर त्यांनी त्यावेळी सत्तेत असलेल्या फडणवीस सरकारवर टीका केल्याने ते भाजपामध्ये एकाकी पडले. पण नंतर देशमुखांनी ऑक्टोबर 2018 मध्ये काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पश्चिम नागपूर विधानसभेतून निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत फडणवीस हे 48 हजार मतांनी विजयी झाल्याने देशमुखांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती