एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन 20 दिवसांनंतरही सुरुच आहे. त्यातच आता आंदोलनाला बसलेल्या एका कर्मचाऱ्याला हृद्यविकाराचा झटका आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर स्थानकात आंदोलनाला बसलेल्या वाहकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एसटी महामंडळाकडून निलंबनाची नोटीस पोस्टाने पाठवण्यात आली होती.
निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीस इकडे दुर्लक्ष केलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.