Maharashtra Rain Update : राज्यात पुढील 5 दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (09:56 IST)
Maharashtra Rain Update :सध्या राज्यात श्रावणसरी बरसत आहे. शुक्रवारी मराठरवाड्यातील काही भागात मेघसरी सुरु आहे. विदर्भात देखील पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 5 दिवस म्हणजे शनिवार पासून 25 ऑगस्ट पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. चांगला पाऊस आल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चांगला पाऊस असल्यामुळे पीक चांगला येणार. या मुळे  शेतकरी आनंदात आहे. 
 
हवामान खात्यानं शनिवार पासून कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात आणि त्याच्या सर्व जिल्हा आणि जळगाव मध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 
 
पुण्यात देखील येत्या तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून यलो अलर्ट जारी केलं आहे. तर  मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 



Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती