Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (18:10 IST)
* एकादशी श्राद्धाला काय करावे
* 2024 मध्ये एकादशी श्राद्ध कधी
* भाद्रपद कृष्ण एकादशी या दिवशी पितरांसाठी काय करावे
 
या वेळी 2024 मध्ये, श्राद्ध पक्ष 17 सप्टेंबर, मंगळवारपासून सुरू झाला असून श्राद्ध महालय भाद्रपद अमावस्या तिथीला संपेल बुधवार, 02 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येला आहे. 
 
श्राद्ध पक्षाच्या 16 तिथी आहेत मात्र त्यातील काही तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच पिंडदान आणि तर्पण हे श्राद्ध पक्षाच्या काळात केलेच पाहिजे. या तिथींमध्ये एकादशी तिथीचे श्राद्ध अतिशय विशेष मानले जाते. मान्यतेनुसार जरी या दिवशी आपल्या कोणत्याही मृत व्यक्तीच्या मृत्यूची तिथी नसली तरीही श्राद्ध तर्पण केलेच पाहिजे. एकादशीला श्राद्ध केल्याने पितरांचा उद्धार होऊन त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
 
तर चला जाणून घेऊया पितरांच्या उद्धारासाठी एकादशीला काय करावे-
 
• एकादशीचे श्राद्ध केल्याने पूर्वज अधोगतीतून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतात.
 
• मान्यतेनुसार जर तुमच्या पूर्वजांपैकी कोणीही जाणूनबुजून केलेल्या पापांमुळे यमलोकात (नरकात) त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत असेल तर या एकादशीला व्रत करून या व्रताचे पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले जाते. त्यांच्या पूर्वजांची या शिक्षेतून मुक्तता करून स्वर्ग प्राप्त होतो.
 
• एकादशी तिथीचे श्राद्ध केल्याने ऋषी आणि संन्यासी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
• पितृ पक्ष एकादशीच्या दिवशी शालिग्राम मूर्तीचे पूजन करावे. ब्राह्मण भोजन आणि पितरांना तर्पण केल्याने सर्व प्रकाराचे संकट-समस्या दूर होतात आणि अडकलेले काम पूर्ण होतात. घरात सुख-शांती आणि समृद्धी वाढते.
 
• श्राद्ध पक्षातील एकादशीला सर्व प्रथम देवतांना अग्निग्रास अर्पण करावे. त्यानंतर गाई, कावळे, कुत्रे, मुंग्या, मासे यांना अन्न द्या आणि पिंपळाच्या झाडाखाली अन्न आणि पाणी ठेवा. अशा प्रकारचे काम केल्याने एकादशीचे दुप्पट फळ मिळते आणि सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
 
• भाद्रपद कृष्ण एकादशीला श्राद्ध करणार्‍यांना निरंतर ऐश्वर्य प्राप्ती होते.
 
• एकादशी तिथीला संन्यास घेणार्‍या लोकांची श्राद्ध करण्याची परंपरा आहे.
 
• या दिवशी एकादशी व्रत केले जाते. त्यामुळे यावेळी इंदिरा एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे.
 
• एकादशीच्या दिवशी श्राद्ध दान केले तर ते श्रेष्ठ दान आहे.
 
• या दिवशी व्रत आणि श्राद्ध केल्याने पितृदेवता आर्यमा आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.
 
• या एकादशीचे व्रत आणि श्राद्ध केल्याने ऋणातून मुक्ती मिळते.
 
• जे एकादशी तिथीचे श्राद्ध करतात त्यांना सर्व वेदांचे ज्ञान होते.
 
• एकादशीला श्राद्ध करणाऱ्यांच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात.
 
• या दिवशी पूजन केल्याने जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळू शकते.
 
अस्वीकरण: औषध, आरोग्याशी संबंधित उपाय, योग, धर्म, ज्योतिष, इतिहास, पुराणे इत्यादी विषयांवर वेबदुनियावर प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत, जे विविध स्रोतांमधून घेतले आहेत. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. आरोग्य किंवा ज्योतिष शास्त्राशी संबंधित कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. हा मजकूर सार्वजनिक हित लक्षात घेऊन येथे सादर केला आहे, ज्याला कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती