विधीमंडळाचे अधिवेशन संस्थगित

गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (17:12 IST)
देशाच्या सीमेवर असणारी स्थिती लक्षात घेवून अंतर्गत सुरक्षा अबाधीत राखण्यासाठी  विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षेकरिता तैनात असलेले सहा हजार पोलिस मुंबईसह राज्यातील अन्य भागात उपलब्ध करुन देण्‍याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घाबरुन जाण्याची स्थिती नसून, अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.
 
यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की,  आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहरासोबतच अन्य शहरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त निगराणी असावी. ही पोलिस विभागाची भावना आहे. घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र काळजी घेण गरजेचे आहे.

वेबदुनिया वर वाचा