पुढचा हफ्ता कधी येणार यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे की मला सभागृहाला आश्वासन द्यायचे आहे कोणतीही शन्का घेऊ नका, आम्ही सुरु केलेल्या योजना बंद होणार नाही.लाडक्या बहिणींनी आपल्या प्रेमाचा वर्षाव महायुतीवर करून विजय मिळवून दिला आहे. हे सत्र सम्पतातच डिसेम्बरचा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल. लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाही.
लाडक्या बहिणींना' 2100 रुपये कधी मिळणार?
महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जातील. असे फडणवीस म्हणाले होते. मात्र वाढलेली रकम अदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पानंतर वाढवून मिळणार आहे. सध्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हफ्त्याचे 1500 रुपये मिळणार आहे.