खुशखबर, मुंबई ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस दररोज धावणार

बुधवार, 13 जानेवारी 2021 (21:05 IST)
मुंबई ते नवी दिल्ली या दरम्यान असलेली राजधानी एक्सप्रेस आता दररोज धावणार आहे. रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. याचा फायदा उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. ही रेल्वे यापूर्वी आठवड्यातून ३ दिवसच होती. खासदार उमेश पाटील यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. त्यास गोयल यांनी मान्यता दिली. या रेल्वेमुळे अवघ्या १५ तासात राजधानी दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती