पाकिस्तान जेलमध्ये कैद असलेल्या मासेमारी करणाऱ्या भारतीयाचा मृत्यू,

शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (15:50 IST)
विनोद लक्ष्मण कोल हे मूळचे पालघर मधील डहाणू येथील रहिवासी असून ते गुजरात मध्ये मासे पकडणाऱ्या नाव वर काम करीत होते.मिळलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान जेल मध्ये बंद असलेले विनोद कोल यांचा मृत्यू झाला असून त्यांचे शव 29 एप्रिलला त्यांच्या गावी पोहचण्याची शक्यता आहे. 
 
विनोद हे गुजरात मध्ये पंजीकृत मासे पकडणाऱ्या नाव वर काम करीत होते. त्यांना अटक करण्यात आली. मासे पकडणाऱ्या नाव वर त्यांचे काम सुरु करण्यापूर्वी दोन महिने आधीची ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी तटरक्षक कडून पाकिस्तानी क्षेत्रीय जल मध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना पकडण्यात आले. 
 
मिळलेल्या माहितीनुसार, आठ मार्चला या मच्छीमाराला पॅरालिसिसचा अटॅक आलाआणि ते तिथेच कोसळले. त्यानंतर पाकिस्तानच्या एका रुग्णालयात त्यांचा पाचार सुरु होता. जेल मधील अन्य भारतीयांना त्यांच्या मृत्यू बाबत 17 मार्चला सांगितले गेले. सांगण्यात येत आहे की, भारतीय कैदी जेल कर्मचारींच्या मदतीने त्यांच्या  कुटुंबाशी संपर्क वाढण्यात यशस्वी झालेत. त्यांनी व्हाट्सअपच्या मदतीने त्यांच्या आजाराबद्दल कुटुंबापर्यंत माहिती पोहचवली. 
 
यानंतर ही आशंका घेण्यात आली की, मच्छीमाराचे शव त्यांच्या घरी पाठवले जाणार नाही. यामुळे कुटुंबाने मदतसाठी स्थानीय आमदारांशी संपर्क साधला. एमएलने हा मुद्दा केंद्र सरकार यांना सांगितला. ज्यानंतर पाकिस्तानी समकक्षांशी बोलणे झाले. यानंतर त्यांचे शव भारतात पाठवण्याची सहमती मिळाली. पाकिस्तानमध्ये कैदींच्या अधिकारांसाठी  काम करणारे सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी जतीन देसाई आहे. त्यांनी सांगितले की विनोदचे शव 29 एप्रिलला भारतीय अधिकारींकडे सोपवण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, 'भारत सरकारच्या अधिकारींना एक भारतीय कैदीच्या मृत्यूबाबत सूचना दिली गेली. यानंतर त्यांचे नाव महाराष्ट्रच्या कैदीच्या यादीत मिळाले. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती