सोलापुरात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, सुदैवाने जन हानी नाही

शुक्रवार, 21 जून 2024 (19:51 IST)
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शुक्रवारी एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट आणि आग लागली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात गनपावडर ठेवण्यात आल्याने एकापाठोपाठ एक असे अनेक स्फोट झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  
 या फटाक्यांच्या कारखान्यात जवळपास 15 महिला काम करतात. मात्र आज वट पौर्णिमेमुळे सर्व महिलांनी सुटी घेतली होती. त्या महिला कारखान्यात असत्या तर मोठा अनर्थ घडू शकला असता.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील घारी गावात असलेल्या वेलकम फटाक्यांच्या फटाका कारखान्यात शुक्रवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली.
कारखान्यात अचानक आग लागल्यानंतर जोरात स्फोटांचे आवाज येऊ लागले. आकाशात धुराचे ढग उठू लागले. हा स्फोट एवढा जोरदार होता की शेजारी राहणारे गावकरी घाबरले. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला.

या कारखान्यात 15 महिला कामगार काम करतात सुदैवाने आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी सुट्टी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
या आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे 40 लाखांचे फटाके जळाले आहे. पांगरी पोलीस पुढील कारवाई करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती