पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा जाणार?

मंगळवार, 6 जुलै 2021 (10:34 IST)
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे.काळ पहिल्या दिवशीच भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले.त्याचा परिणाम विधिमंडळाच्या सभागृहात आणि बाहेर झाल्याचे समजले.
 
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काय घडामोडी घडणार या कडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.आज या परिसरात महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याचे वृत्त समजले आहे. तसेच सत्ताधारी पक्षाकडून केंद्र सरकार ने तीन कोटी लसी दर महिन्याला द्यावा अशी मागणी केली जाणार आहे. तसेच महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.या मध्ये देवेंद्र फडवणीस काही प्रकरणे मांडण्याची शक्यता देखील आहे.  
 
काही ठराव कृषी कायद्या विरोधात मांडण्याची शक्यता आहे.या कडे देखील सर्वांचे लक्ष आहे.कांग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मागणी करत  आहे.आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकी काय घडामोडी घडणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती