ज्यांना दोन बायका आणि दोन पेक्षा जास्त मुले आहे त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. किंवा दोन पेक्षा जास्त बायका आणि मुले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळू नये अशी अट सरकारने घालावी.असे म्हणणे विश्व हिंदू परिषदेचे आहे. ज्यांची संख्या जास्त आहे. असे लोक या योजनेचा लाभ घेत आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली.
विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे की काही खास लोक याचा वापर करतात, ज्यांची संख्या जास्त आहे, ज्यांना दोन बायका आहेत, त्यांना दोन फायदे होतील. ज्यांना 6 मुले आहेत त्यांना जास्त फायदा होईल. ज्याची एक पत्नी आहे त्याला फक्त एक फायदा होईल. ज्याला एक मूल असेल त्याला एकच फायदा मिळेल. ज्याला सरकारी लाभ घ्यायचा असेल त्याला लोकसंख्या नियंत्रण राबवावी लागणार.
लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंधने घालणे आवश्यक आहे. असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. त्या साठी त्यांनी सरकारला या योजनेत अशा अटी जोडण्याचे आवाहन केले आहे. या मुळे लोकसंख्या नियंत्रण होण्यात मदत होईल.हा विषय राष्ट्रहिताच्या असून त्यात धार्मिक भावना मिसळू नये असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे.