ठाणे महानगर पालिका क्षेत्रीय आपदा प्रबंधन प्रकोष्ठ प्रमुख यासिन तडवी म्हणाले की, आजद नगर परिसरामध्ये दरगाह गल्लीतील पाच मुलं संध्याकाळी पाच वाजता खेकडे पकडण्यासाठी मुंब्रा डोंगरावर खादी मशीन नावाच्या परिसरात गेले. पण ते रस्ता भटकले यानंतर त्यांनी आवाज दिले. त्यावेळे तिथून जाणाऱ्या काही लोकांनी त्यांचा आवाज ऐकला. पण ते त्यांना शोधू शकले नाही. मग या लोकांनी दमकल विभागाला सूचना दिली. सूचना मिळाल्यानंतर कर्मचारींनी शोधमोहीम सुरु केली. व सात तासानंतर टीमला या मुलांना शोधण्यात यश आले. व नंतर त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आले.