मिळालेल्या माहितनुसार २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिने दोन पदके जिंकली. कोणत्याही ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तसेच २०२१ मध्ये मनु भाकरला बीबीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. तर पॅरा शूटिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अवनी लेखराला बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकण्यासोबतच, तिने २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून एक मोठी कामगिरी केली.
विजेत्यांचे अभिनंदन करताना, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर या प्रशंसनीय कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी बीबीसीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते. या उपक्रमाद्वारे सन्मानित झालेल्या दिग्गज खेळाडूंनी केवळ क्रीडा क्षेत्रातच महत्त्वाचे टप्पे गाठले नाहीत तर तरुण मुलींना निर्भयपणे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले आहे. तसेच बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही यांनी दिल्लीत संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. ते म्हणाले की, मनू भाकरची ऑलिंपिकमधील ऐतिहासिक कामगिरी हा भारतीय खेळांसाठी एक निर्णायक क्षण आहे. एका प्रतिभावान तरुण नेमबाज ते विक्रमी ऑलिंपियनपर्यंतच्या तिच्या प्रवासाने केवळ भारतातच नव्हे तर बाहेरही खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. अवनी लेखराला पॅरा स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करताना आम्हाला सन्मान वाटतो. त्यांची चिकाटी आणि विक्रमी यश पॅरा स्पोर्ट्सना अधिक समावेशक आणि उत्कृष्ट बनवण्याचा मार्ग दाखवत आहे." तसेच ते म्हणाले की, भारतातील प्रेक्षकांप्रती बीबीसीची वचनबद्धता आमच्या नात्याला खास बनवते. भारताच्या असाधारण महिला खेळाडूंच्या कामगिरीचा आनंद साजरा करताना आम्हाला अभिमान वाटतो.
भारताची सर्वात तरुण पॅरालिम्पिक पदक विजेती म्हणून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल १८ वर्षीय तिरंदाज शीतल देवीला बीबीसी इमर्जिंग प्लेअर देण्यात आला आहे. अवघ्या तीन वर्षांत तिने अनेक मोठ्या कामगिरी केल्या. त्याने २०२४ च्या पॅरिस पॅरालिंपिकमध्ये कांस्यपदक, २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. त्याच वेळी, त्याने जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.