माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने धाडसत्र सुरूच ठेवले आहे. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर तब्बल 30 तास सखोल चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ईडीचे अधिकारी कागदपत्रांसह बाहेर पडले. त्यासोबत पाच अधिकाऱ्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेमधून साडेपाचच्या सुमारास ईडीचे अधिकारी मुख्य शाखेतून बाहेर पडले. तब्बल 30 तास अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली. यावेळी कर्मचाऱ्यांना शाखेबाहेर काढण्यात आले होते.
दरम्यान, चौकशीसाठी जिल्हा बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याला इतर कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला. अधिकाऱ्यांना त्याबाबत घेऊ नका अशी भूमिका इतर कर्मचाऱ्यांनी घेतली.
Edited by : Ratnadeep Ranshoor