कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल असं काही केंद्रातील अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. निदान ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरला आहे. माझ्याविरोधात काही केसेस नाही. परंतु ही जेव्हा बातमी येते जेव्हा आश्चर्य वाटतेच असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हिंदू जनआक्रोश मोर्चे निघतायेत. तुम्हाला विधेयक आणण्यापासून कुणी रोखलंय? बेटी बेटी के तुकडे कर देंगे हे माझ्याच बहिणीला धमकी देतायेत. हिंदू धर्मातील मुलींनाच धमक्या देतायेत. ही कुठली पद्धत झाली असं त्यांनी सांगितले.
राज्यावर ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज
राज्यावर सध्या ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ज्या घोषणा केल्या जातायेत त्यासाठी पैसे आहेत वाटत नाही. आर्थिक दृष्ट्या ही धोक्याची घंटा आहे. अशाच पद्धतीने राज्य कारभार चालला तर महाराष्ट्रात दिवाळखोरी होईल असा आरोप एनसीपी नेते जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर केला.