पावणेतीन लाख मीटर नायलॉन मांजा जप्त

मंगळवार, 4 जानेवारी 2022 (08:46 IST)
वर्धा येथील तळेगाव (श्यामजी पंत) येथील सिडीएट कंपनीतील कामगार घरी परत येताना अमरावती मार्गावर पतंग उडवणाऱ्या नायलॉन मांजाने गळा चिरला. यात संदीप परोपटे हे गंभीर जखमी झाले होते याबाबत lokशाही न्यूजने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते.याची दखल घेत शहरात सर्रासपणे विक्री सुरू असलेल्या दुकानात तळेगांव पोलिसांनी धाडसत्र टाकून नायलॉन मांजा जप्त केला आहे.
 
नायलॉन मांजावर बंदी घातली असून मांजा विक्रीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाचे आहे.मात्र नियमाला बगल देत व्यावसायिककडून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विक्री केली जाते. यातच तळेगांव मधील रहिवाशी असलेले संदीप परोपटे हे सिडीएट कंपनीत कामगार आहे. कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर घरी परत येताना पतंग उडवत असताना मांजा दिसून आला नसल्याने त्यांचा गळा चिरला यात त्यांना गंभीर इजा होऊन त्यांच्यावर उपचार केल्यानंतर 24 टाके लागले.
 
ही घटना भयंकर होती तातडीने उपचार केल्याने जीव वाचला असे कुटुंबातील सदस्य सांगत आहे.तळेगांव शहरात पोलिसांनी धाडसत्र राबविले यात तब्बल 2 लाख 72 हजार चारशे नव्वद मीटर मांजा दुकानातून जप्त केले.दुकानातून तपासणी केली दरम्यान त्याठिकाणी नायलॉन मांजा व नायलॉन चायना मांजा आढळून आला.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष गजभिये , उपनिरीक्षक हुसेन शहा , मंगेश मिलके, रोशन करलूके, श्याम गहाळ, दिगंबर रुईकर यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती