महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या लाचखोर सतीश चिखलीकर प्रकरणात मोठा प्रकार उघड झाला आहे. या लाचप्रकरणातील खटल्याची मूळ तक्रार फाईलच जिल्हा सत्र न्यायालयातून संशयास्पदरित्या हरवली आहे. तर या फाईलच्या जागी न कोणत्याही साक्षीदार, तक्रारदाराची सही नसलेली बनावट तक्रार कागदपात्रांमध्ये दाखल झाली आहे. त्यातील काही मजकूरही बदलल्याचं समोर आले असून मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे.