Maharashtra Marathi Breaking News Live Today: मुंबईतील जुहू परिसरात मुलगा दोन वर्षाच्या मुलीवर पडला. यादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी निष्काळजीपणाच्या आरोपाखाली जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलगी तिच्या कुटुंबीयांच्या दुकानाजवळ खेळत असताना 2 जानेवारी रोजी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा हा मित्रांसोबत तिथे मस्ती करत होता. मुलाचा तोल गेल्याने आणि तो 2 वर्षाच्या मुलीवर पडला, त्यामुळे मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या वेळी जखमी मुलीला तातडीने मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे मुलीचा मृत्यू झाला.