मुलाच्या लग्नापूर्वी आई-वडिलांची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

बुधवार, 8 जानेवारी 2025 (10:07 IST)
Nashik News: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील टिळकवाडी परिसरात मुलाच्या लग्नाच्या काही दिवस आधी एका जोडप्याने आत्महत्या केली. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.  

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील जयेश रसिकलाल शाह 58 आणि रक्षा जयेश शाह 55 यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या दांपत्याची दोन मुले आणि मोठ्या मुलाची पत्नीही या जोडप्यासोबत राहत होती. रविवारी संध्याकाळी नातेवाईकांसोबत जेवल्यानंतर जयेश आणि रक्षा यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या जोडप्याचा मोठा मुलगा आणि त्याची पत्नी शहराबाहेर गेले होते, तर लहान मुलगा परत आला तेव्हा त्याला ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. या दाम्पत्याला रुग्णालयात नेले असता सोमवारी दुपारी  त्यांना मृत घोषित करण्यात आले.
ALSO READ: नागपुरात लग्नाचा वाढदिवस साजरा करून जोडप्याची आत्महत्या

घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून सरकारवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती