कोल्हापुरात भाचीने पळून जाऊन लग्न केल्यावर मामाने समारंभाच्या जेवणात विष मिसळले

बुधवार, 8 जानेवारी 2025 (15:38 IST)
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे संतापलेल्या तिच्या मामाने स्वागत समारंभाच्या जेवणात विष मिसळून दिले. ही बाब समारंभातील पाहुण्यांना समजल्यावर घबराट पसरली. 
 
काय आहे प्रकरण -
मामाच्या इच्छेच्या विरुद्ध भाचीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग मामाला आला आणि मामाने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या जेवणात विष मिसळले. आचारीने मामाला रोखण्याचा प्रयत्न देखील केला. या कारणामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. तरीही मामा जेवणात विष मिसळून पळून गेला. 

सदर घटना कोल्हापुर जिल्ह्यातील उत्रे  गावात घडली आहे.समारंभातील आलेल्या पाहुण्यांना हे समाजतातच सर्वत्रभीतीचे वातावरण पसरले.महेश जोतिराम पाटील असे या मामाचे नाव आहे. 

लग्नाला मुलीच्या पालकांची सम्मती होती आणि लग्नानन्तर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. नातेवाईक या समारंभात आलेले होते. ते वधू आणि वराला  आशीर्वाद देण्यात व्यस्त होते. दरम्यान मामाने बाहेर तयार होत असलेल्या जेवणात विष मिसळले आणि तेथून पसार झाला. मामाला शोधण्यासाठी पोलिसाची पथके रवाना झाली असून या घटनेची चर्चा कोल्हापुरात होत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती