अभिनेत्री पूनम धिल्लनच्या घरात चोरी
28 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत आरोपी अभिनेत्रीच्या घरी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. फ्लॅट रंगवायला आलेल्या लोकांमध्ये तो होता. घरी असताना त्याला कपाट उघडे दिसले, त्याचा फायदा घेत त्याने चोरी केली. खार पोलिसांनी एका व्यक्तीला चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.