एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार गोव्यातून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सायंकाळी साडे सातच्या सुमारास बंडखोर आमदार विमानतळावर दाखल होणार आहेत. ते मुंबईत दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत कॅबिनेट व राज्य मंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या 11 दिवसांपासून सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईला रवाना झाले आहेत. कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.