कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (08:40 IST)
बेळगाव- महिन्याभरापूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आदर्शनगर राम कॉलनी येथील रहिवासी नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) यांचा  सकाळी मृत्यू झाला.
 
9 जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना नागेश यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते.
 
 दरम्यान गुरुवारी सकाळी नागेश यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वहिनी, तीन पुतण्या असा परिवार आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वीच नागेश यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. आठवडाभरात घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्यामुळे कुसाणे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागेश यांच्या मृत्यूची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी. कुसाणे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. सोमवार दि. 13 रोजी रक्षाविसर्जन होणार आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती