Devendra Fadnavis sworn in as Chief Minister: देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, सलमान खान आणि संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले आणि यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार झाले.
तसेच शपथविधी सोहळ्यापूर्वी शाहरुख खानने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रणवीर सिंग, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त, विद्या बालन यांसारखे कलाकार या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दोनदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली असून आता त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.