मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन अधिकारींनी सांगितले की, काँक्रीट मिक्सर ट्रकमध्ये तीन कर्मचारी होते. ट्रक पलटी झाल्यावर दोन कामगारांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या, पण एकजण दबला गेला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गुरुवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत चाललेल्या बचाव कार्यात मृतदेह बाहेर काढण्यात आला. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.