आवाजी मतदानाने विश्वासदर्शक मंजूर करण्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक ठराव विधिमंडळात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर विधानसभेने पूर्ण विश्वास व्यक्त केला, असा एक ओळीचा प्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभेत आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.