बीडमधील सरपंचाच्या हत्येतील आरोपींची मालमत्ता जप्त होणार, देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले निर्देश

रविवार, 29 डिसेंबर 2024 (15:14 IST)
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सीआईडीला दिले आहे. गृह विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती शनिवारी दिली. तसेच ज्या लोकांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे अशा लोकांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.   

मुख्यमंत्री आणि गृहमन्त्रालयाची पदे स्वीकारल्यानंतर महिन्याच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्या प्रकरणी विरोधक हल्लाबोल करत आहे. या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिस सीआईडी करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सीआईडीला खूनाच्या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले आहे. 
या प्रकरणात शनिवारी राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत बीड मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि स्थानिक नेते उपस्थित होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात पवनचक्की उभारणाऱ्या ऊर्जा कंपनीकडून खंडणीच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे देशमुख यांची हत्या करण्यात आली.

ही घटना 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली, त्यावेळी संतोष देशमुख हे त्यांचे चुलत भाऊ शिवराज देशमुख यांच्यासोबत टाटा इंडिगो कारमधून मसाजोग गावाकडे जात असताना वाटेतच काही लोकांनी त्यांची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी थांबवली आणि सहा जणांनी कार मधून उतरून सरपंच संतोष यांना गाडीतून बळजबरी काढून पळवून नेले नंतर त्यांचा मृतदेह केज तालुक्यातील दाहितना फाटा येथे सापडला 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती