भंडारा येथे शालेय क्रीडा महोत्सवा दरम्यान दोन गटात हाणामारी

रविवार, 29 डिसेंबर 2024 (13:11 IST)
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांब केंद्रांतर्गत असलेल्या काटेमहाणी येथे 26, 27 व 28 डिसेंबर रोजी केंद्रीय स्तरावर शालेय क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे पहिले दोन दिवस छान पार पडले. 28 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास उसर्ला व सालई खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कबड्डी उपांत्य फेरीचा सामना सुरू होता, दोन्ही गावातील लोक प्रेक्षक म्हणून उपस्थित होते.
 
सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गावातील लोक एकमेकांवर लाठ्या-काठ्या, खुर्च्या व इतर गोष्टींचा मारा करत होते. या घटनेनंतर केंद्रप्रमुखांनी पुढील सामने रद्द करत उर्वरित पुढील सामने होणार नसल्याचे सांगितले.
ALSO READ: मुंबई मेट्रो फेज 3 ट्रेनचे डबे गोंदवली ते अंधेरी पश्चिमेपर्यंत तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित
काटेमहाणी, उसर्ला, सालई खुर्द येथील लोकांमध्ये मारामारी सुरू असताना या घटनेची माहिती तुमसर पोलीस ठाण्यात देण्यात आली. तुमसर पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थली हजर झाले अणि दोन्ही गटातील लोकांना शांत केले. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काटेमहाणी येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात वाद झाला आणि त्यामुळे हाणामारी झाली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून शिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्यांच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत पुन्हा खेळ सुरू होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती