भंडारा मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात

गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (10:56 IST)
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीचे छत कोसळल्याने 30 ते 40 महिला जखमी झाल्या.   
 
छत कोसळल्याची घटनाही मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लोक गच्चीवर उभे होते.   
 
तसेच मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतील महिला लेझीम नाचत असताना छत कोसळले. अनेक महिला छताखालीही उभ्या होत्या. तर 40 महिला जखमी झाल्या आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती